केंद्रीय अन्वेषण विभागानं विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहाय्यासाठी येणाऱ्या सर्व विनंत्यांची इंटरपोलद्वारे प्रक्रिया सुविहित करण्याचं काम भारतपोल पोर्टल च्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामध्ये रेड नोटिस जारी करण्यासह इतर नोटिसांचा समावेश आहे. सर्वांसाठी सुरक्षित भारत निर्माण करण्याच्या मोदी सरकारच्या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी या पोर्टलमुळे भारतीय तपास यंत्रणांना जगभरात जागतिक पोहोच वाढवता येणार असल्यानं त्यांना अधिक परिणामकारकपणे काम करता येईल असं अमित शहा यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
Site Admin | January 7, 2025 10:37 AM | केंद्रीय अन्वेषण विभाग | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह | भारतपोल पोर्टल