ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आज मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा सुमित नागल आणि चेक रिपब्लिकचा तोमास महाच यांच्यामधल्या सामना आज संध्याकाळी साडेपाचला सुरु होईल. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा ही टेनिस खेळातल्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक आहे.
यानिक सिन्नर, नोवाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वरेव, कार्लोस अल्काराझ यांच्यांसारखे कसलेले खेळाडू यात खेळणार आहेत.