संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठक घेतली. सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असून संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालावं ही सरकार आणि विरोधक दोघांची जबाबदारी असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना म्हटलं.
अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी केलं. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन राम मेघवाल, जे पी नड्डा, चिराग पासवान, रामदास आठवले आणि काँग्रेस नेते जयराम रमेश, गौरव गोगोई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, द्रमुक नेते टी आर बाळू, तिरुची शिवा,आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि AIMIM चे नेते असदुद्दीन ओवेसी या बैठकीला उपस्थित होते.
उद्यापासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी २०२४-२५ या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील. अधिवेशनादरम्यान सरकार सहा नवीन विधेयकं मांडण्याची शक्यता आहे.