कोरेगांव भीमा इथं आज होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार केलं आहे. अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयायांकरता जिल्हा प्रशासनानं विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. सांगली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी वटवाघुळांनी द्राक्षबागा फस्त करण्याचा प्रकार बऱ्याच ठिकाणी घडला होता. अशा वेळी नागठाणे इथले द्राक्ष बागायतदार धनाजी पाटील यांनी बदलतं हवामान आणि वटवाघुळांपासून द्राक्ष बागेचं संरक्षण करुन द्राक्षांचं चांगलं उत्पादन घेतलं. त्यांच्या शेतातल्या काळ्या द्राक्षांना प्रतिकिलो 137 रुपये भाव मिळाला. याविषयी माहिती देताना धनाजी पाटील म्हणाले,
Site Admin | January 1, 2025 10:02 AM