डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

आठवी आशिया चषक महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा भारतात होणार

आठवी आशिया चषक महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा भारतात होणार आहे. आशियाई हॉकी महासंघाचे अध्यक्ष दातो फ्युमियो ओगुरा यांनी ही घोषणा केली आहे. हॉकी इंडिया आणि बिहार राज्य सरकार संयुक्तपणे याचं आयोजन करत असून बिहारमधल्या राजगीर इथं 11 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होईल. बिहार राज्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धा होत असल्यानं हा ऐतिहासिक क्षण असल्याचं हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की यांनी सांगितलं. 20 नोव्हेंबर पर्यंत चालणार्‍या या स्पर्धेत भारतासह विद्यमान चीन, जपान, कोरिया, मलेशिया आणि थायलंड संघांचा सहभाग अपेक्षित आहे. गेल्या वर्षी झारखंडमधल्या रांची इथं झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ विजयी झाला होता.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा