त्रिपुरामध्ये आगरतळा इथं आज ईशान्य राज्य परिषदेची 72 वी बैठक होणार आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राज्यमंत्री डॉक्टर सुकांता मुजुमदार हे देखील या बैठकीत सहभागी होणार आहेत. तसंच ईशान्येकडील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि मुख्यमंत्रीसुद्धा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमुळे ईशान्य प्रदेशाच्या विकासाला गती मिळेल असा विश्वास केंद्रिय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल व्यक्त केला.
Site Admin | December 21, 2024 9:08 AM | Amit Shah | Tripura