नवी दिल्लीत भारत मंडपम इथं सुरु असलेल्या ५२ व्या जागतिक पुस्तक मेळाव्याची आज सांगता होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या मेळाव्याचं उदघाटन झालं होतं. शैक्षणिक पुस्तकांपासून आत्मचरित्र आणि कादंबऱ्या अशी विपुल साहित्य संपदा असलेला हा मेळावा राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि भारत व्यापार प्रोत्साहन संस्थेनं आयोजित केला आहे.
या पुस्तक मेळ्यात पुस्तकप्रेमींना एकाच ठिकाणी जगभरातलं विविध प्रकारचं साहित्य उपलब्ध झालं. याशिवाय, लेखकांचं चर्चासत्रं, पुस्तकांचा लोकार्पण सोहळा, साहित्यिक सत्रं आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले होते.