ठाणे शहरातल्या जांभळी नाक्याजवळच्या कडवा गल्लीतल्या पांडे हाऊस या धोकादायक इमारतीचा जीर्ण भाग आज सकाळी दहाच्या सुमाराला कोसळला. ही इमारत नव्वद वर्ष जुनी होती, आणि जीर्ण झालेली असल्यानं रिकामी केलेली होती. त्यामुळं सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे.
Site Admin | July 7, 2024 6:38 PM | Thane
ठाणे : जांभळी नाक्याजवळील पांडे हाऊस इमारतीचा जीर्ण भाग कोसळला
