डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 17, 2025 4:01 PM | Thane

printer

ठाणे जिल्ह्यात माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक

ठाणे जिल्ह्यात बदलापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेवकाला ब्लॅकमेल करत त्याच्याकडून जबरदस्तीनं पैसे वसूल करणाऱ्या चौघांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह फोटो माजी नगरसेवकाला या चौघांनी पाठवला होता. हा फोटो समाज माध्यमावर टाकण्याची बदनामीची धमकी देत नगरसेवकाकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी माजी नगरसेवकानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत शनिवारी बदलापूरमधून ३२ वर्षांच्या एका व्यक्तीला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याच्या अन्य तीन सहकाऱ्यांची नावं समोर आली आणि त्यांनाही अटक करण्यात आली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा