ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरातून चार बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. भिवंडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली असून त्यांचा तपास सुरु असल्याची माहिती भिवंडी शहर पोलीस आयुक्तांनी दिली. सध्या भिवंडी शहरात युद्धपातळीवर शोध मोहीम सुरु असून गेल्या २५ दिवसात एकूण २३ बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे.
Site Admin | December 31, 2024 3:33 PM | Thane
ठाणे भिवंडी शहरातून चार बांगलादेशी नागरिकांना अटक
