थायलंडमधे आज एमपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला. हा रुग्ण कांगोमधून थायलंडमधे आल्याचं निष्पन्न झालं आहे. त्याच्या आरोग्य चाचण्या करण्यात येत असून त्याला विलगीकरणात पाठवल्याचं थायलंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं. आफ्रिकेबाहेर थायलंड आणि स्वीडन या देशांमधे मंकी पॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. २०२२ पासून ११६ देशांमधे मिळून ९९ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले असून त्यातल्या २०८ जणांचा मृत्यू झाल्याचं जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते.
Site Admin | August 21, 2024 7:48 PM | monkeypox