कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पाच लाख धावांचा टप्पा गाठणारा इंग्लंड हा जगातला पहिला संघ ठरला आहे. एकूण १ हजार ८२ सामने खेळून आणि ७१७ खेळाडूंच्या सहभागातून इंग्लंडने हा विक्रम नोंदवला आहे.
इंग्लंड संघाने १८७७ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली कसोटी खेळली होती. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा संघही इंग्लंड आहे.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांमध्ये दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलिया संघाचा तर भारतीय संघाचा तिसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलिया संघाच्या ४ लाख, २८ हजार ८१६ धावा आहेत. ५८६ कसोटी सामने खेळलेल्या भारताने ३१६ खेळाडूंच्या सहभागातून २,लाख ७८ हजार,७५१ धावा केल्या आहेत.