भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशीही दोन्ही संघांचे मिळून १५ गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या होत्या. भारताच्या वतीनं रविंद्र जडेजा यानं न्यूझीलंडचे ४ तर रविचंद्रन अश्विन यानं ३ गडी बाद केले. न्यूझीलंडच्या वतीनं यंग वील यानं सर्वाधिक ५१ धावा केल्या.
त्याआधी आज भारतानं पहिल्या डावात न्यूझीलंडवर नाममात्र २८ धावांची आघाडी मिळवली. आज सकाळी भारतानं आपला पहिला डाव, ४ बाद ८६ धावांवरून पुढे सुरू केला. काल नाबाद असलेल्या शुभमन गील आणि ऋषभ पंत यांनी पाचव्या गड्यासाठी ९६ धावांची भागिदारी करत भारताचा डाव सावरला. गील यानं ९० तर पंत यानं ६० धावांची खेळी केली. मात्र पंत झाल्यानंतर भारताचे उर्वरीत फलंदाज ठराविक अंतरानं बाद होत गेले आणि भारताचा पहिला डाव २६३ धावांत आटोपला. न्यूझीलंडच्या एजाज पटेल यानं भारताचा निम्मा संघ तंबूत पाठवला.