देश नक्षलमुक्त होण्याच्या दिशेने मोठी पावलं उचलत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हंटलं आहे. देशातील नक्षलवादी जिल्हयाची संख्या 12 वरुन 6 वर आणण्यात सरकारला यश आल्याचं त्यांनी नमूद केलं.
केंद्र सरकार,नक्षल चळवळी विरोधात कठोर पावलं उचलत असून, सशक्त, सुरक्षित आणि समृद्ध भारताची निर्मिती करत आहे. 31 मार्च 2026 पर्यन्त देशातून नक्षल चळवळ समूळ नष्ट होईल असा विश्वास शाह यांनी व्यक्त केला आहे.