भारताचे टेनिसपटू एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्ली या दोघांनी इटली इथं झालेल्या एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. त्यांनी काल झालेल्या अंतिम फेरीत द्वितीय मानांकित जोडीवर ६-३, २-६, १२-१० अशी मात केली. एटीपी चॅलेंजर टूरमधलं ऋत्विकचं हे दुसरं, तर बालाजीचं पहिलंवहिलं जेतेपद आहे.
Site Admin | November 24, 2024 2:48 PM | Tennis
टेनिस : भारताच्या एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोल्लीपल्ली जोडीनं एटीपी चॅलेंजर टूर स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलं
