डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

कतार खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा सामना ब्रिटन सोबत

कतार खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा युकी भांबरी आणि त्याचा क्रोएशियन जोडीदार इव्हान यांचा सामना ब्रिटनच्या लॉईड ग्लासपूल आणि ज्युलियन कॅश या जोडीशी होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा सामना सुरू होईल.

 

भांबरी आणि डोडिग या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशियाच्या मेट पाविच आणि एल साल्वाडोरच्या मार्सेलो या जोडीवर मात केली. या सामन्यात पहिला सेट गमावल्या नंतरही दमदार पुनरागमन करत त्यांनी सामना २-६, ६-३, १०-८ असा जिंकला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा