ऑस्ट्रेलियात मेलबर्न इथं आज सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचं आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आलं. सुमित नागलला झेक रिपब्लिकच्या टॉमस मचाककडून 3-6, 1-6,5-7 असा पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या सामन्यात बेलारुसच्या टॉप सीडेड आर्यना सबालेन्काने अमेरिकन खुल्या स्पर्धेची माजी विजेती स्लोआन स्टीफन्सवकवर 6-3, 6-2 अशी मात केली. पुरुष एकेरीत चीनचा झ्वेंग क्विएन, नॉर्वेचा कॅस्पर रुड आणि जपानचा काई निशीकोरी यांनी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.