डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

November 7, 2024 3:35 PM | telecommunications

printer

सॅटेलाइट द्वारे होणारा दूरसंवाद मोबाइल नेटवर्कशी स्पर्धा करणार नाही

 

सॅटकॉम,अर्थात सॅटेलाइट द्वारे होणारा दूरसंवाद हा जमिनीवरच्या मोबाइल नेटवर्कशी स्पर्धा करणार नाही, मात्र तो त्याला पूरक असेल, असं दळणवळण राज्यमंत्री चंद्रशेखर पेमासानी यांनी म्हटलं आहे.

 

ते आज नवी दिल्ली इथं तिसऱ्या भारतीय अंतराळ परिषदेला संबोधित करत होते. सॅटकॉम ला व्यापक कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी ते ५G आणि ६G यासारख्या स्थलीय नेटवर्कला पूरक असल्याचे समजायला हवे, असे ते म्हणाले.

 

५G आणि उदयोन्मुख ६G तंत्रज्ञानाला सॅटकॉम ची जोड मिळाल्यावर ते जमिनीवर आणि अवकाशात दोन्हीकडे संपर्क प्रस्थापित करू शकेल. भारतामधली डिजिटल तफावत दूर करण्यासाठी सॅटकॉमचा वापर तळागाळापर्यंत करायला हवा, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा