नागरिकांना चांगल्या गुणवत्तेची दूरसंचार सेवा मिळण्यासाठी सर्व दूरसंचार सेवा पुरवठादारांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केंद्रीय दूर संपर्क मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्या आहेत. शिंदे यांनी दूरसंचार सेवा पुरवठादारांसोबत काल नवी दिल्ली इथं बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
सेवेची गुणवत्ता आणि दूरसंचार सेवेला एका उंचीवर घेऊन जाण्यासाठीचं भारताचं सीक्स-G च्या ध्येयाबद्दल शिंदे यांनी चर्चा केली. देशात शंभर टक्के ब्रॉडबँड कव्हरेज करण्यासाठी सहाय्यक ठरणारं धोरण आखण्याची मागणी यावेळी दूरसंचार पुरवठादारांनी केली.