तेलंगणामध्ये नगरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम लेफ्ट बँक कनॉल बोगदा प्रकल्पात अडकलेल्या कामगार आणि अभियंत्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र करण्यात येत आहे. या बोगद्याचा काही भाग काल सकाळी कोसळल्याने आठ कर्मचारी अडकून पडले. चिखल, पाणी आणि गाळामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचायला बचाव पथकाला अडचणी येत असल्याची माहिती तेलंगणाचे पाटबंधारे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी दिली आहे. कर्मचारी अडकून पडलेला बोगद्याचा भाग हा धोकादायक स्थितीत असून तिथपर्यंत पोहोचण्यासाठी ढिगारा काळजीपूर्वक उपसावा लागत असल्याची माहिती राज्यमंत्री जे. कृष्णा राव यांनी माध्यमांना दिली आहे.
Site Admin | February 23, 2025 8:11 PM | SLBC Tunnel | Telangana
तेलंगणामध्ये बोगदा प्रकल्पात अडकलेल्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य तीव्र
