तेलंगणाच्या वारंगळ जिल्ह्यात मामुनरु महामार्गावर झालेल्या एका रस्ता अपघातात ५ जण ठार झाले असून ६ जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.
लोखंडाच्या सळ्या घेऊन जाणारा एक ट्रक मधल्या सळ्या बांधलेली दोरी अचानक तुटल्यानं चालकाचं ट्र्कवरच नियंत्रण सुटलं आणि तो विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दोन रिक्षांवर आदळला. या अपघातात रिक्षातील प्रवासी जागीच मृत्यूमुखी पडले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जखमींवर योग्य ते उपचार करण्याचे आदेश दिले आहेत.