डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

तेलंगणा उच्च न्यायालयाने के. तारक रामाराव यांनी दाखल केलेली याचिका फेटाळली

तेलंगणा उच्च न्यायालयानं माजी मंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे कार्यकारी अध्यक्ष के. तारक रामाराव यांनी दाखल केलेली याचिका आज फेटाळून लावली. सत्तेत असताना २०२३ मध्ये फॉर्म्युला ई-कार शर्यतीच्या आयोजनात गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं २९ डिसेंबरला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. राव यांनी हा गुन्हा रद्द करण्याची मागणी केली होती. या प्रकरणात ईडीसमोर हजर राहण्यासाठी राव यांनी आणखी वेळ मागितला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा