तेलंगण सरकारनं शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलींची अधिसूचना काल प्रसिद्ध केली. शेतकऱ्यांच्या एका कुटुंबाला दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्यात येणार आहे, असं या नियमावलीत नमूद करण्यात आलं आहे. शेतकरी कुटुंब निश्चित करण्यासाठी नागरी पुरवठा विभागानं दिलेली अन्नसुरक्षा पत्रिका ग्राह्य धरली जाणार आहे. बारा डिसेंबर 2018 ते 9 डिसेंबर 2023 या काळात शेतकऱ्यांनी व्यावसायिक बँका, ग्रामीण बँका आणि जिल्हा सहकारी बँका यांच्यामार्फत घेतलेल्या अल्प मुदतीच्या कर्जांना माफी दिली जाईल, असंही या नियमावलीत स्पष्ट करण्यात आलं आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तेलंगण सरकार एक विशेष संकेतस्थळही सुरू करणार आहे.
Site Admin | July 16, 2024 2:58 PM | Farmers Loan Waiver | Telangana Government