डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शेतजमिनीसाठी प्रतिएकर १२,००० रुपये देण्याचा तेलंगणा मंत्रिमंडळाचा निर्णय

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी रायथू भरोसा योजनेंतर्गत शेतजमिनीसाठी प्रति एकर १२,००० रुपये देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या १०,००० रुपयांच्या मदतीमध्ये ही वाढ करण्यात आली आहे. इंदिरम्मा आत्मीय भरोसा योजना या प्रस्तावित योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष १२ हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. २०२३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी, काँग्रेस पक्षानं रयथू भरोसा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत वाढवण्याचं आणि भूमिहीन शेतमजुरांना आर्थिक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं होतं.या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूल अधिकारी सर्व पंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करतील आणि लोकांना कोणती जमीन रयथू भरोसा योजनेसाठी पात्र आहे आणि कोणती नाही याबद्दल सविस्तर माहिती देतील,असंही मुख्यमंत्री रेड्डी यांनी काल सांगितलं. या योजनांची अंमलबजावणी येत्या २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनापासून करण्यात येणार आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा