तेलंगणात काल वीस महिलांसह ८६ नक्षलवादी पोलिसांना शरण आले. नक्षलग्रस्त भागात शांतता आणि सामान्य जनजीवन प्रस्थापित करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांमधला हा एक मोठा टप्पा आहे. शरण आलेल्यांच्या पुनर्वसनासाठी तात्काळ मदत म्हणून प्रत्येकी २५ हजार रुपये देण्यात आले. या नक्षलवाद्यांनी विशेषतः त्यांच्यातल्या महिलांनी यापुढे शांतता आणि विकासाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचं तेलंगणाचे पोलीस महासंचालक चंद्रशेखर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, आंध्र प्रदेशातही ११ माओवादी पोलिसांना शरण आले. त्यांच्या पुनर्वसनासाठी लवकरच मदत दिली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
Site Admin | April 6, 2025 1:01 PM | Telangana
तेलंगणामध्ये ८६ नक्षलवादी शरण
