डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 9, 2025 3:15 PM | CP Radhakrishnan

printer

शिक्षकांनी बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यं रुजवावीत- राज्यपाल

सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षण हे एक महत्त्वाचं साधन आहे. शिक्षकांनी बदलतं तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्यं रुजवावीत, असं आवाहन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ३३व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. या समारंभात दहा विद्यार्थ्यांना राज्यपालांनी सुवर्णपदक देऊन गौरवलं.

 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत आपण परिवर्तनाचं युग सुरू केलं आहे, असं राज्यपाल यावेळी म्हणाले. विद्यार्थी, समाज आणि उद्योगांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील, असंही त्यांनी सांगितलं. उच्च शिक्षणातलं सकल नोंदणीचं प्रमाण २०३५पर्यंत ५० टक्क्यांपर्यंत न्यायचा निर्धार केला असून यामुळे शिक्षणक्षेत्रातल्या सर्वांवर पडलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असंही राज्यपालांनी सुचवलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा