डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण द्यावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शिक्षक आणि पालकांनी मुलांना नेहमी महिलांचा आदर करण्याची शिकवण दिली पाहिजे, असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. 

 

शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीच्या विज्ञान भवन इथं देशभरातल्या ८२ शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावर अधिक भर देण्यात आला असून त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो, असं सांगताना राष्ट्रपतींनी शिक्षण क्षेत्र सर्वसमावेशक केल्याबद्दल शिक्षकांचं कौतुक केलं. 

 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातल्या चार शिक्षकांचाही समावेश आहे. यात जाजावंडीच्या पुपीर प्राथमिक डीजिटल शाळेच्या शिक्षक मंतैया चिन्नी बेडके, कोल्हापूरच्या एसओयू लोहिया शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे सागर बागडे यांचाही राष्ट्रपतींनी गौरव केला. याविषयी ते म्हणाले

 

पुण्याच्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाच्या इंग्रजीच्या प्राध्यापिका शिल्पागौरी गणपुले, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक श्रीनिवास होथा आणि आयटीआय प्राध्यापक विवेक चांदलिया यांचा समावेश आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा