अकोला जिल्ह्यात २३६ ग्रामपंचायतींची क्षयरोग मुक्तीकडे वाटचाल सुरु असून क्षयरोगमुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार देखील दिला जात आहे. क्षयरूग्णांचे प्रमाण आणि मृत्यू शून्यावर आणण्यासाठी क्षयरोग निर्मूलन मोहिम प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी दिले आहेत. प्रौढांच्या बीसीजी लसीकरणासाठी ७५ हजारहून अधिक व्यक्तींनी पूर्वनोंदणी केली असून ३४ टक्के लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयानं दिली. क्षयरूग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची सीवायटीबी तपासणी करून त्यांच्यावर आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येत आहेत.
Site Admin | January 20, 2025 8:07 PM | Akola