तानसेन संगीत महोत्सवाच्या शताब्दीनिमित्त काल मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं ९ वाद्यं एकाच वेळी सलग ९ मिनिटांसाठी वाजवून विश्वविक्रम करण्यात आला. मध्य प्रदेशसह देशातल्या अन्य भागांमधून आलेले ५३६ स्त्रीपुरुष कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. संगीसम्राट तानसेन यांची रचना असलेल्या मल्हार, मिया की तोडी आणि दरबारी कानडा रागांवर आधारित संगीतरचना यामध्ये सादर करण्यात आल्या. बासरीवादक पंडित रोणू मुजुमदार यांनी या सादरीकरणाचं संयोजन केलं होतं.
Site Admin | December 16, 2024 9:43 AM | Tansen Music Festival