तमिळनाडूतल्या चार जिल्ह्यात १७ ऑक्टोबरपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या तयारीचा आढावा आज मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी घेतला.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज राज्याच्या हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे दक्षिण आंध्रप्रदेश आणि उत्तर तामिळनाडूत दरड कोसळण्याचीही शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत चेन्नई, कांचीपुरम, तिरुवलुर आणि चेंगलपट्टू इथल्या शाळांना उद्या सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच समुद्राजवळ राहणाऱ्या लोकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अरक्कोणम इथली दोन एनडीआरएफ पथकं आणि तिरुनेलवेली इथल्या सहा पथकांना बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आलं आहे.