तामिळनाडूत अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम पक्षानं राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युतीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
मोदींनी त्यांच्या समाजमाध्यमांवरील संदेशात, रालोआ आघाडीच्या इतर भागीदारांसह तामिळनाडूच्या प्रगतीसाठी परिश्रम करतील आणि राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जातील असं म्हटलं आहे.