तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. या अभिजात भाषांसह इतर सर्व भारतीय भाषांना प्रोत्साहन देण्यास सरकार वचनबद्ध आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येही सर्व भारतीय भाषांना प्राधान्य देण्यात आलं आहे, असंही त्यांनी उत्तरात नमूद केलं आहे.
तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि ओडिया या सहा भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा
