तामिळनाडूच्या विरुधूनगर जिल्ह्यात सत्तूर भागात आज एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. फटाके तयार करताना विद्युत गळती किंवा स्फोटकांमधल्या घर्षणामुळे स्फोट झाला असावा, असा अंदाज आहे.
Site Admin | January 4, 2025 8:14 PM | Tamil Nadu Explosion
तामिळनाडूमधे झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू, २ जण जखमी
