चेन्नईमध्ये काल हवाई दलाच्या प्रात्यक्षिकांनंतर मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारनं घेतला आहे. एकूण ५ जणांचा काल चेन्नईमध्ये मृत्यू झाला. उष्णता आणि वैद्यकीय कारणांमुळे नागरिकांचे प्राण गेले. यापुढे अशाप्रकारचे कार्यक्रम आयोजित करताना योग्य काळजी घेतली जाईल, अशी माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी दिली.
Site Admin | October 7, 2024 8:17 PM