डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

March 1, 2025 11:12 AM | Ukraine | US

printer

अमेरिका- यूक्रेन दरम्यानची दुर्मिळ खनिजांवरील कराराची चर्चा निष्फळ

अमरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप आणि यूक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्या दरम्यान दुर्मिळ खनिजांवरील कराराची चर्चा निष्फळ ठरली. चर्चेनंतर ट्रंप यांनी बातमीदारांना सांगितलं की झेलेंस्की हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा द्वेष करतात त्यामुळं झेलेंस्की यांच्यासोबत सहमती होणं कठीण आहे. तर झेलेंस्की यांनी रशियासोबत युद्धावर कोणतीही तडजोड करणं शक्य नाही असं ट्रंप यांना ठणकावून सांगितलं आणि करारावर स्वाक्षरी न करताच ते व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले. नंतरची संयुक्त वार्ताहर परिषदही रद्द करण्यात आली.

 

झेलेंस्की हे शांततेसाठी तयार असतील तेव्हा ते परत अमेरिकेत येऊ शकतात असं ट्रंप यांनी एका संदेशात सांगितलं. युक्रेनला रशियाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेची मदत करण्याच्या मोबदल्यात युक्रेनमधील दुर्मिळ खनिजं आणि अन्य नैसर्गिक साधनस्रोतांवर अमेरिकेला हक्क देण्याचा करार या दोन्ही देशांदरम्यान होणं अपेक्षित होतं परंतु ती चर्चा आता फिसकटली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा