चीनने तैवानजवळ लष्करी कवायतींना सुरुवात केली आहे. तैवानने आपला राष्ट्रीय दिवस साजरा केल्याच्या दुसऱ्याच दिवशी या लष्करी कवायती होत आहेत. उत्तर, दक्षिण आणि पूर्व तैवानमध्ये सुरू असल्याचं चीनच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनची लष्करी विमानं आणि जहाजं तैवानला चहुबाजूंनी वेढत आहेत, तैवानच्या हवाई क्षेत्रात गस्त घालत आहेत, सागरी आणि जमीनीवरच्या तळांना लक्ष्य करत आहेत, असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं आहे.
तर तैवानने चीनच्या या कृतीचा निषेध केला असून देशाचं स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी सैन्याने कारवाई सुरू केल्याचं म्हटलं आहे. ११ पीएलए विमानं, नौदलाच्या सात जहाजांसह अकरा जहाजं तैवानच्या संरक्षणासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.