मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणा याची भारतातल्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका अमेरिकेच्या न्यायालयाने फेटाळली आहे. भारतात आपलं प्रत्यार्पण केल्यास आपल्यावर अत्याचार केले जातील त्यामुळे हे प्रत्यार्पण रोखावे अशी मागणी त्याने केली होती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या वेळी त्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच्या प्रत्यार्पणाला मंजूरी दिली होती.
Site Admin | March 7, 2025 1:46 PM | Tahawwur Rana
मुंबई अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पण रोखण्यासाठीची याचिका फेटाळली
