April 1, 2025 1:59 PM April 1, 2025 1:59 PM

views 12

सर्वसामान्य नागरिकांचा रिझर्व बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

भारतीय रिझर्व्ह बँकेशी सामान्य नागरिकांचा थेट संबंध येत नसला, तरी त्यांच्या सर्व आर्थिक देवाणघेवाणी रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारीत येतात, त्यामुळे देशाच्या सर्व नागरिकांचा रिझर्व बँकेवरचा दृढ विश्वास ही मौलिक ठेव आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ९०व्या स्थापनादिन सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमात त्या मुंबईत बोलत होत्या. डिजिटल व्यवहारांमध्ये भारताला जागतिक पातळीवर महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात आरबीआयनं महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असल्याचं त्या म्ह...

December 5, 2024 2:35 PM December 5, 2024 2:35 PM

views 13

भारतीय रिझर्व्ह बँकेचं वित्त धोरण उद्या होणार जाहीर

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वित्त धोरण समितीची बैठक काल मुंबईत झाली. उद्या बँकेचं वित्त धोरण जाहीर होणार आहे. बँकेनं फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दरात कोणताही बदल केलेला नसून, तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर स्थिर राखला आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं युपीआय लाइटची मर्यादा ५०० रुपयांवरुन एक हजार रुपये केली आहे. मात्र, एकंदर मर्यादा पाच हजार असल्याचं बँकेनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. या नवीन मर्यादा तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत.

August 10, 2024 6:56 PM August 10, 2024 6:56 PM

views 6

बँकिंग क्षेत्रात बहुप्रतिक्षित सुधारणा सरकार राबवत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन

सरकार बँकिंग क्षेत्रात बहुप्रतिक्षित सुधारणा राबवत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती संचालक मंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होत्या. बँकिंग नियमन सुधारणांची दीर्घ काळापासून गरज होती असं त्यांनी सांगितलं. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर तसंच लोकसभेनं काही सुधारणांसह वित्त विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर ही बैठक घेण्यात आली. बँकांनी आपल्या व्यवहारात कोअर बँकिंगवर लक्ष केंद्रित करण्याच्या आवश्यकतेवर अर्थमंत्र्...