August 26, 2024 7:27 PM August 26, 2024 7:27 PM
10
आदिवासी बांधवांचा सर्वांगीण आणि आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत – राज्यपाल
आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी, आणि विशेषतः आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. आदिवासी जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर आदर्श आदिवासी गाव बनवणं आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं, या विषयाबाबत आज मुंबईत राजभवनात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. ‘प्रधानमंत्री जनमन योजने’च्या राज्यातल्या अंमलबजावणीचा आढावाही त्यांनी घेतला. आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचा विकास साधण्या...