April 9, 2025 10:02 AM April 9, 2025 10:02 AM

views 8

पंढरपूरात चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा

पंढरपूर इथं चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा काल साजरा झाला. सुमारे तीन लाखांहून जास्त भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल-रखुमाईचं दर्शन घेतलं. दरम्यान, पंढरपूर इथं भाविकांच्या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी आता कृत्रिम बुद्धिमत्ता-एआय-तंत्रज्ञानाचा वापर होणार असून, याबाबतची चाचणी काल पंढरपूरच्या बसस्थानकावर घेण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.