October 19, 2025 9:28 AM October 19, 2025 9:28 AM

views 79

यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्‍या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. नेट परीक्षा दिनांक 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देण्यात आली. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबर आहे. परीक्षा कोणत्या शहरांमध्ये आणि कोणत्या केंद्रांवर होईल, याची यादी परीक्षेच्या 10 दिवस आधी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. याबाबत सविस्...

January 14, 2025 1:57 PM January 14, 2025 1:57 PM

views 24

UGC-NET Exam : 15 जानेवारीला होणारी युजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली

राष्ट्रीय चाचणी संस्था - एनटीएनं उद्या १५ जानेवारीला नियोजित युजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. पोंगल, मकरसंक्रांत आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात येत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएनं निवेदनाद्वारे कळवलं आहे.

August 12, 2024 1:39 PM August 12, 2024 1:39 PM

views 12

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

यूजीसी नेट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. येत्या २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या परीक्षेला देशभरातले ९ लाख परीक्षार्थी बसणार असून त्यामुळे त्याबाबत ऐनवेळी तारीख बदलता येणार नाही, असं स्पष्ट करून सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेतल्या पीठाने ही याचिका फेटाळली.