November 12, 2024 6:37 PM November 12, 2024 6:37 PM

views 12

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही – देवेंद्र फडणवीस

महायुतीचं सरकार कुणालाही उद्ध्वस्त करुन विकास करणार नाही. सर्वांना सोबत घेऊन जाणारं सरकार असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पालघर जिल्ह्यात डहाणूत ते प्रचारसभेत बोलत होते. वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांच्या विरोधात खोटा प्रचार करून विकासात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. जल, जमीन आणि जंगलाचे रक्षण करण्याचं आश्वासन त्यांनी आदिवासींना दिलं. पालघरमध्ये विमानतळाची मागणी प्रधानमंत्री नरेेंद्र मोदी यांनी मंजूर केली आहे. वाढवण बंदर, को...

November 6, 2024 7:02 PM November 6, 2024 7:02 PM

views 11

महाराष्ट्रात महायुतीचं  सरकार आवश्यक आहे – योगी आदित्यनाथ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आपण महाराष्ट्रात आलो असून देशाला सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचं सरकार आवश्यक आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशिम इथं झालेल्या जाहीर सभेत सांगितलं.   एकजुटीनं राष्ट्रविरोधी शक्तीच्या विरोधात लढा द्या, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी वाशिम मंगरूळपीर विधानसभा मतदारसंघातले भाजपचे उमेदवार श्याम खोडे उपस्थित होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मूर्तिजापूर  मतदारसंघात महायुतीचे ...

October 25, 2024 7:15 PM October 25, 2024 7:15 PM

views 12

‘महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत, उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होणार’

महायुतीमध्ये २७७ जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर दोन दिवसांत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. भाजपाची दुसरी आणि तिसरी यादी केंद्रीय निवडणूक समितीच्या मंजुरीनंतर जाहीर होईल. तोपर्यंत इच्छुकांनी अर्ज भरू नये, असं त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना बजावलं.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राज्यात सुमारे १३ ठिकाणी सभा होणार आहेत. सध्या मुंबई, नवी मुंबई, गोंदिया, अकोला, नांदेड आणि धुळे ही ठिकाणं निश्चित झाली आहेत. उर्वरित लवकरच होतील, असं त्यांन...

October 16, 2024 3:08 PM October 16, 2024 3:08 PM

views 17

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं रिपोर्टकार्ड प्रसिद्ध

महाराष्ट्रात काल विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी महायुतीने आज सरकारच्या आजपर्यंतच्या कामांचा आढावा घेणारं प्रगती पुस्तक प्रकाशित केलं.   महाविकास आघाडीने अडीच वर्षांत अनेक प्रकल्पांमध्ये अडथळे आणले. पण, महायुतीचं सरकार आल्यानंतर विकासाला गती मिळाली, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संयुक्...