November 21, 2025 1:32 PM November 21, 2025 1:32 PM
21
BSF ला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य – गृहमंत्री
अतुलनीय शौर्य, धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. सीमा सुरक्षा दलाच्या ६१व्या स्थापनादिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथे आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते. गेली सहा दशकं सीमा सुरक्षा दल देशाच्या सीमांचं रक्षण करत असून हे दल सीमेवर असताना शत्रू एक इंचही घुसखोरी करू शकत नाही, हे संपूर्ण जगाला दाखवून दिल्याचं शहा म्हणाले. गृह मंत्रालयाने पुढच्या पाच वर्...