November 25, 2024 7:59 PM November 25, 2024 7:59 PM

views 5

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांची भेट

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज रोम इथं फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल बॅरोट यांची भेट घेतली. यावेळी उभय नेत्यांमध्ये भारत आणि फ्रान्स देशांतील भागीदारी,युक्रेन आणि जागतिक समस्यांवर चर्चा झाली. डॉक्टर जयशंकर यांनी भूमध्य संवाद परिषदेवेळी लेबनॉनचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बोहबीब आणि क्रोएशियाचे परराष्ट्र मंत्री गॉर्डन ग्रलिक रेडमॅन यांच्याशीही चर्चा केली.