August 5, 2025 8:16 PM August 5, 2025 8:16 PM
2
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात ढगफुटी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात धराली इथं आज दुपारी झालेली ढगफुटी आणि खिरगंगा नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जिवीत आणि वित्त हानी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे. या पुरामुळे धऱाली इथली संपूर्ण बाजारपेठ उद्धवस्त झाली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचं उत्तरकाशीचे जिल्हाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितलं. लष्कराच्या जवानांचं पथक, SDRF, NDRF, जिल्हा प्रशासनानं घटनास्थळी तातडीनं मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून १५ ते २० नागरिकांना स...