November 18, 2024 7:05 PM November 18, 2024 7:05 PM
10
महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आदित्य ठाकरे यांचा आरोप
महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नगरविकास खात्यात घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुंबईत वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. मुंबई शहरात मेट्रोचं काम अद्याप अपूर्ण आहे. मेट्रोमार्गासाठी बसवलेल्या खांबांवर अनेक ठिकाणी अद्याप गर्डर टाकणं बाकी असताना त्याचं रंगकाम करण्यात आलं आहे. यासाठी ७४ कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला