August 1, 2024 2:47 PM August 1, 2024 2:47 PM
8
मध्य पूर्व आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं आवाहन
हमास संघटनेचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिया याची इराणमध्ये हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर मध्य पूर्व आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न वाढवण्याचं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केलं आहे. चीन, रशिया, अल्जेरिया या देशांनी हनिया याच्या हत्येचा निषेध केला असून हे दहशतवादी कृत्य असल्याचं इराणच्या संयुक्त राष्ट्रांमधल्या राजदूतानं म्हटलं आहे. तर मध्य पूर्वेत अस्थिरता निर्माण करणाऱ्या शक्तींना इराण पाठिंबा देत असल्याचं अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनं म्हटलं आहे. इस्रायलच्या हल्...