August 24, 2024 2:14 PM August 24, 2024 2:14 PM
7
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून निवृत्ती
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमधून तसंच देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. समाजमाध्यमांवर प्रसारित केलेल्या एका चित्रफितीद्वारे धवनने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. चाहत्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल शिखर धवनने कृतज्ञता व्यक्त केली. त्याने डिसेंबर २०२२ मध्ये बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. धवनने २०१० ते २०२२ पर्यंत ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय सामने आणि ६६ T20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व...