August 26, 2024 8:09 PM August 26, 2024 8:09 PM

views 17

आशियाई सर्फिंग सांघिक स्पर्धेत भारताला रौप्य पदक

मालदीवच्या थुलुसधू इथं झालेल्या आशियाई सर्फिंग २०२४ स्पर्धेत सांघिक प्रकारात भारतानं आज रौप्य पदक जिंकलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून जपान ५८ पूर्णांक ४० गुणांसह प्रथम स्थानी आहे, तर भारत २४ पूर्णांक १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.  तैपेई २३ पूर्णांक ९३ गुणांसह तिसऱ्या, तर  चीन २२ पूर्णांक १०  गुणांसह  चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारा हरीश मुथू पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.