October 4, 2024 9:36 AM October 4, 2024 9:36 AM

views 18

काँग्रेस नेते राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते होणार असून उद्या ते संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत.

July 8, 2024 8:00 PM July 8, 2024 8:00 PM

views 7

राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज एक दिवसीय मणिपूर दौरा केला. यावेळी त्यांनी आसामच्या कचार इथल्या पूरग्रस्त कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी जिरीबाम जिल्ह्यात आश्रयाला आलेल्या हिंसाचारग्रस्त कुटुंबांशी संवाद साधला. इन्फाळला भेट दिल्यानंतर राहुल गांधी चुराचांदपूरकडे   रवाना झाले. तिथे मदत केंद्रांना भेट दिल्यावर  ते बिष्णुपूर जिल्ह्यातल्या मदत केंद्रातल्या कुटुंबांशी संवाद साधतील. दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात ते मणिपूरच्या राज्यपाल अनुसुया उईके यांची भेट घेणार आहेत.

July 2, 2024 6:12 PM July 2, 2024 6:12 PM

views 9

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी हक्कभंगाची नोटीस बजावली

आभारप्रस्तावावरच्या चर्चेदरम्यान लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपाच्या बांसुरी स्वराज यांनी आज हक्कभंगाची नोटीस बजावली. राहुल गांधी यांनी सभागृहात सांगितलेल्या काही गोष्टी चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या असून त्याकरता त्यांच्यावर कारवाई करावी असं स्वराज यांनी या नोटिशीत म्हटलं आहे. दरम्यान आपल्या भाषणातले अनेक अंश गाळल्याचा निषेध करुन ते पुन्हा नोंदीत समाविष्ट करण्याची मागणी करणारं पत्र राहुल गांधी यांनी सभापती ओम बिरला यांना लिहीलं आहे.

July 1, 2024 8:07 PM July 1, 2024 8:07 PM

views 10

लोकसभेत राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन गदारोळ

लोकसभेच्या आजच्या कामकाजात आभार प्रस्तावावर चर्चा सुरु असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाषणात केलेल्या एका वक्तव्यावरुन गदारोळ झाला. त्यांच्या विधानावर प्रधानमंत्री, गृहमंत्री आणि लोकसभा सभापतींनी आक्षेप घेतला.  राहुल गांधी हिंदू धर्मीयांना सरसकटपणे हिंसक म्हणत असल्याचं सांगत, हे गंभीर असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. तर गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केली. सभापती ओम बिर्ला यांनी संसद सदस्यांनी सभागृहाचं पावित्र्य राखावं अशी टीका केली. नंतर राहुल गांधी या...